अधिक स्वच्छ, निरोगी भविष्याचा मार्ग आपण दररोज घेत असलेल्या लहानसहान निर्णयांपासून सुरू होतो. म्हणूनच आम्ही सतत पर्यावरणावर सकारात्मक परिणाम करण्याचे आणि ऊर्जा, पाणी व इतर नैसर्गिक स्रोतांचा अधिक जबाबदार पद्धतीने वापर करण्याचे मार्ग शोधत असतो. म्हणूनच Gradient Canopy इथे, आम्ही वर्तुळाकार डिझाइन तत्त्वे लक्षात घेऊन इमारत तयार करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे मर्यादित नैसर्गिक स्रोतांची मागणी कमी होण्यात मदत होते. शक्य तितक्या काळासाठी साहित्य वापरात ठेवणे हा वर्तुळाकार डिझाइनचा उद्देश आहे, म्हणूनच आम्ही इमारतीमध्ये जतन केलेले आणि टाकाऊ मालातून मिळालेले साहित्य समाविष्ट केले आहे.
Gradient Canopy इथे, आम्ही संपूर्ण इमारतीमध्ये जतन केलेल्या स्रोतांकडून उपलब्ध झालेली ३० हून अधिक उत्पादने स्थापित केली आहेत. यामध्ये टाकाऊ मालातून मिळालेले लाकूड, बाइक रॅक, लॉकर, कार्पेट आणि टाइल यांचा समावेश आहे, जे अन्यथा भरावक्षेत्रामध्ये गेले असते. या प्रमाणात जतन केलेले साहित्य समाविष्ट केल्याने इमारतीला International Living Future Institute (ILFI) चे Living Building Challenge (LBC) Materials Petal सर्टिफिकेशन मिळवण्यात मदत झाली आहे, ज्याचा उद्देश विषारी नसलेली, पर्यावरणीयदृष्ट्या रिस्टोअर करणारी आणि पारदर्शक अशी साहित्य अर्थव्यवस्था निर्माण करण्यात मदत करणे आहे.
इमारतीच्या आकारामुळे, आम्ही योग्य प्रमाणात टाकाऊ मालातून मिळालेले साहित्य मिळवण्यासाठी अनेक धोरणे विकसित करणे आवश्यक होते. उदाहरणार्थ, टाकाऊ मालातून मिळालेल्या टाइल किंवा कार्पेट यांसारख्या गोष्टी मिळवणे अवघड होते, कारण डिझाइनमध्ये बरेच काही आवश्यक होते आणि ते संपूर्णपणे परिमाणे, रंग व भौतिकत्वाने सुसंगत असणे आवश्यक होते.
आम्ही वापरलेले महत्त्वाचे धोरण म्हणजे Google इथे आमच्या स्वतःच्या साठवलेल्या साहित्याच्या साठ्यातील आयटमचा पुनर्वापर करणे. याचा अर्थ असा, की आम्ही आमच्या साठवलेल्या अतिरिक्त साहित्याकडे लक्ष दिले, ज्यामध्ये मागील प्रोजेक्टमध्ये वापरात नसलेले अतिरिक्त नवीन साहित्य आणि इमारती पाडण्यापूर्वी काढून टाकलेल्या वस्तू समाविष्ट होत्या. आमच्याकडे आधीपासून असलेले साहित्य पाहता, आम्ही जतन केलेली कार्पेट टाइल, बाइक रॅक, सिरॅमिक टाइल आणि अकॉस्टिक सीलिंग टाइल समाविष्ट करू शकलो.
जतन केलेले साहित्य समाविष्ट केल्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, विविध स्थानिक स्रोतांकडून टाकाऊ मालातून मिळालेले लाकूड वापरणे. उदाहरणार्थ, बांधकामादरम्यान काढून टाकलेले लाकूड आम्ही संपूर्ण इमारतीमध्ये ठेवलेले बेंच बनवण्यासाठी वापरले. जतन केलेल्या लाकडाचा पुरवठा करण्यासाठी आम्ही स्थानिक विक्रेत्यांशीदेखील संपर्क साधला, ज्याचा वापर बाइक स्टोरेज भागामध्ये वॉल पॅनलिंग आणि Google Store मध्ये फ्लोरिंग यासारख्या गोष्टींसाठी केला जातो.