Google च्या स्थापनेपासून, आम्हाला असा मनापासून विश्वास आहे, की आमच्या कंपनीचे यश आमच्या कामगारांच्या हातात आहे. यामुळेच आम्ही Googler, आनंद आणि एकत्रित स्वास्थ्य यांसाठी आमच्या जागा डिझाइन करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. Gradient Canopy इथे, सर्वात आधी वापरकर्ता ही मानसिकता आम्ही अंतर्गत जागेचे नियोजन करण्यासाठी वापरलेल्या, डिझाइनसंबंधी एका मोठ्या कल्पनेपर्यंत विस्तारते: इमारतीचे फक्त दोन मजल्यांमध्ये विभाजन करणे. इथे, डेस्क आणि टीम यांसाठीच्या जागा वरच्या मजल्यावर आहेत, जिथे इनडोअर “प्रांगणां” ची मालिका त्यांना जमिनीच्या पातळीवरील सुविधा असलेल्या जागांशी जोडते, ज्यामध्ये कॉन्फरन्स रूम, प्रांगणे आणि सर्व टीमसाठी जागा आहेत.
दुसऱ्या मजल्यावरील वर्कस्पेस या सस्टेनेबिलिटी, अनुकूलता आणि लक्ष केंद्रित करून केले जाणारे काम विचारात घेऊन डिझाइन केल्या गेल्या. वरचा संपूर्ण मजला प्रीफॅब्रिकेटेड रूम, भिंती आणि कास्टरवरील फर्निचर यांनी बनलेला आहे. यामुळे लवचिकता मिळते, जिथे शून्य कचऱ्यासह जागा सहजपणे रूपांतरित करता येतात, कारण नवीन कॉन्फिगरेशनमध्ये तेच साहित्य पुन्हा वापरले जाऊ शकते. या मजल्यावर लक्ष केंद्रित करून केल्या जाणाऱ्या कामासाठी प्रशस्त जागादेखील आहे, तर खालच्या मजल्यावर दिवसभर मानसिक आणि शारीरिक ब्रेकसाठी सहयोग करण्याच्या जागा आहेत.
Gradient Canopy च्या पहिल्या मजल्यावरील इनडोअर प्रांगणे लोकांना एकत्र आणण्यात आणि प्रत्येकाला निरोगी, उत्पादक वातावरण उपलब्ध होईल याची खात्री करून आमच्या टीमना सपोर्ट करतात. सामान्य ऑफिसमध्ये, तुम्हाला उपक्रमाचे विविध घटक आणि सुविधांच्या जागा डेस्क स्पेससह एकत्रितपणे दिसू शकतात. खुल्या पायऱ्या असलेली एकूण २० प्रांगणे दोन्ही मजल्यांना जोडतात, ज्यामुळे सुविधांचा सहज अॅक्सेस मिळतो, तसेच ती बहुउद्देशीय भाग म्हणूनही काम करतात, ज्यांचा वापर टीम बहुउपयोगी, लवचीक जागा म्हणून करू शकतात.
लोकांना त्यांचे सर्वोत्तम काम करता यावे म्हणून लक्ष केंद्रित केल्या जाणाऱ्या भागांना उच्च ॲक्टिव्हिटी झोनपासून वेगळे करण्यात मदत करण्यासोबतच, प्रांगणे ही बायोफिलिक फायदेदेखील देऊ करतात आणि Googlers ना दिवसभरात रिचार्ज होण्यात मदत करतात. आम्हाला माहीत आहे, की सर्वोत्तम डिझाइन ही निसर्ग आणि मानवी आरोग्य यांच्यातील सखोल आत्मीयता दर्शवतात, म्हणून आम्ही Gradient Canopy मध्ये बायोफिलिक डिझाइन तत्त्वे समाविष्ट केली आहेत, जेणेकरून लोकांची भरभराट होईल अशी जागा तयार होईल. बायोफिलिक डिझाइन विविध प्रकारच्या जागा देऊ करतात, ज्या निसर्गात अनुभवल्या जातात त्यासारख्याच बहुसंवेदी उत्तेजनांना प्रोत्साहन देतात. वेगवेगळ्या पातळ्यांदरम्यान फिरत असताना शारीरिक हालचालींच्या शरीरक्रियात्मक फायद्यांना प्रांगणांमुळे प्रोत्साहन मिळते, ज्यामुळे लोकांना इमारतीमधून नवीन पदपथ मिळतात, जे त्यांच्या मेंदूंना चालना देऊ शकतात आणि दिवसभर सर्जनशीलता वाढवू शकतात. त्यांमुळे क्लेरेस्टरी खिडक्यांमधून खालच्या पातळीवर दिवसाचा प्रकाश मिळवण्यातदेखील मदत होते, ज्यामुळे निकोप दैनिक सिस्टीमच्या कार्यक्षमतेला सपोर्ट करण्यात मदत होते.