अनेक दशकांपासून, आम्ही सर्वात निकोप अंतर्गत पर्यावरणे कशी डिझाइन करावी हे एक्सप्लोर केले आहे. Google च्या संस्थापकांनी आमच्या सुरुवातीच्या इमारतींमध्ये हातात धरण्याच्या पार्टिकल काउंटरने आतील हवेची गुणवत्ता मोजतानाच्या कथांपासून आमच्या रेट्रोफिटेड इंटीरियरमध्ये अनावश्यक विषारी पदार्थ येऊ नयेत याची खात्री करण्यासाठी मागील वर्षांमध्ये हजारो उत्पादनांची छाननी करण्यापर्यंत, आम्ही दीर्घकाळापासून निकोप वर्कस्पेस तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्हाला अभिमान वाटतो, की Gradient Canopy हा International Living Future Institute (ILFI) Living Building Challenge (LBC) Materials Petal सर्टिफिकेशन मिळवणारा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रोजेक्टपैकी एक आहे, ज्याचा उद्देश विषारी नसलेली, पर्यावरणीयदृष्ट्या रिस्टोअर करणारी आणि पारदर्शक साहित्यविषयक अर्थव्यवस्था निर्माण करण्यात मदत करणे हा आहे.
आम्ही Gradient Canopy आणि Google अतिथी अनुभव यांमध्ये लोकांसाठी आणि पर्यावरणासाठी निकोप असणाऱ्या साहित्यांना प्राधान्य दिले. इमारतीमध्ये स्थापित केलेल्या प्रत्येक साहित्याचे उत्पादकाने पुनरावलोकन केले आहे, जेणेकरून ते LBC ची रेड लिस्ट यामधील घटकांपासून मुक्त असल्याची खात्री करता येईल, जी मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर नकारात्मक परिणाम करणारी सर्वात वाईट प्रकारची रसायने आहेत. बांधकाम उद्योगामध्ये पारदर्शकता आणण्याच्या आमच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या उत्पादकांसोबत काम करून, Gradient Canopy इथे एकूण ८००० हून अधिक उत्पादनांचे पुनरावलोकन केले गेले.
Gradient Canopy इथे निकोप साहित्यांबद्दलचा आमचा दृष्टिकोन हा आतील जागांच्या आणि दररोज आत काम करणाऱ्या Googlers च्या बराच पलीकडे पोहोचतो. इमारतीच्या आतील आणि बाहेरील साहित्य पाहून, ज्यामध्ये इमारतीच्या बाहेरच्या बाजूला स्थापित केलेल्या सहा सार्वजनिक कलाकृतींचा समावेश आहे, आम्ही पुरवठा साखळीतील समुदायांच्या आरोग्याला आणि आमच्या बांधकाम उत्पादनांच्या संपूर्ण जीवनचक्राला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. याचा अर्थ असा, की कार्पेट आणि भिंती यांसारख्या तुम्हाला पाहता आणि स्पर्श करता येणाऱ्या गोष्टींपासून खिडक्यांची कोटिंग आणि इमारतीचे इन्सुलेशन यांसारख्या सहज न दिसणाऱ्या गोष्टींपर्यंत साहित्याची त्यांच्या उत्पादकांकडून काळजीपूर्वक छाननी केली गेली, ज्यामुळे त्यांच्या निवडीमध्ये आरोग्य हा एक प्रमुख घटक असेल याची खात्री करता आली.