Gradient Canopy येथील Google अतिथी अनुभव इथे, Google च्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा पैलू पहिल्यांदाच लोकांसाठी उपलब्ध होणार आहे: आमचा अन्न उपक्रम. नवीन Cafe @ Mountain View हा आमचा सर्वात पहिला लोकाभिमुख डायनिंग अनुभव आहे, ज्यामुळे या ग्रहाला पाठिंबा देण्यासाठी समुदाय अन्न खरेदी करू शकतो आणि आमची सस्टेनेबिलिटी प्राधान्ये व मार्गदर्शक तत्त्वे शेअर करू शकतो.
१९९९ पासून, आमच्या अन्न उपक्रमाने Google च्या सर्जनशीलता, सहयोग आणि समुदाय यांच्या संस्कृतीची जोपासना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अगत्यशील जागांमध्ये स्वादिष्ट, पौष्टिक भोजने देऊ करून, आम्ही मानवी संबंध आणि कल्पनांच्या देवाणघेवाणीला पाठिंबा देण्यासाठी काम करत आहोत. आमच्या भोजनांमुळे असंख्य नवकल्पनांना प्रेरणा मिळाली आहे — ज्यामध्ये Gmail चा समावेश आहे, ज्याचा जन्म कॅफेमधील आमच्या एका दुपारच्या जेवणाच्या वेळी झालेल्या संभाषणातून झाला होता.
Google चा अन्न उपक्रम नेहमीच समुदायाबद्दल राहिला आहे, जसे की अन्न आमच्या कँपसवर तयार करणे आणि ते मिळवून व तयार करून आमच्या अधिक विस्तृत प्रदेशांशी जोडले जाणे या दोन्ही गोष्टींबद्दल. आमचे एक मुख्य पाकशास्त्रीय तत्त्व म्हणजे समुदायाची काळजी घेणे, म्हणजेच आम्हाला हे समजते, की अन्नाबाबत आम्ही जे निर्णय घेतो त्याचा Google वर आणि Google च्या पलीकडेदेखील शृंखलाबद्ध परिणाम होतो. आम्ही तयार केलेल्या मेनूपासून, आम्ही आमचे अन्न कुठे खरेदी करतो, ते कसे तयार करतो यापर्यंत, आमचा अन्न उपक्रम हा स्थानिक पुरवठा साखळ्यांवर आणि आपल्या अधिक मोठ्या ग्रहावर कसा सकारात्मक परिणाम करू शकेल याबद्दल आम्ही सतत विचार करत असतो.
सकारात्मक बदल रुजवण्यासाठी आणि अधिक चांगल्या अन्न प्रणाली असलेल्या भविष्याकरिता मार्ग घालून देण्यासाठी आमचा अन्न उपक्रम हा भविष्याचा विचार करणाऱ्या भागीदारी व सस्टेनेबिलिटी उपक्रमांचे नेतृत्व करतो. स्थानिक पुरवठादारांसोबतच्या आमच्या संबंधांमुळे, आमचे पाककलातज्ञ स्थानिक, हंगामी घटकांपासून प्रेरणा घेऊन खाद्यपदार्थ डिझाइन करतात. आम्ही घटक पुरवठादारांची काळजीपूर्वक छाननी करतो आणि सस्टेनेबिलिटी, वैविध्यपूर्ण व्यवसाय मालकी व समुदाय उन्नती यांसारख्या आमच्या मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्यांसोबत काम करतो. आमचे कार्बन फूटप्रिंट कमीत कमी करण्यासाठी, आम्ही रिजनरेटिव्ह शेती, अपसायकलिंग आणि कमीत कमी पॅकेजिंग करणाऱ्या पुरवठादारांना प्राधान्य देतो आणि शक्य होईल तेव्हा हवाई मार्गाने मालवाहतूक केल्या जाणाऱ्या उत्पादनांपेक्षा स्थानिक उत्पादनांची निवड करतो. या मार्गाने, आम्ही अन्न आणि पेय उद्योगाला पर्यावरणासाठी आणि आपले पोषण करणाऱ्या समुदायांसाठी अधिक चांगल्या असलेल्या जबाबदार पद्धतींकडे वळवत आहोत.
घटक मिळवण्याव्यतिरिक्त, आमच्या अन्न उपक्रमामध्ये आम्ही दोन प्रमुख सस्टेनेबिलिटी पद्धतींवर लक्ष केंद्रित करतो: अन्नाची नासाडी कमी करणे आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचे निर्मूलन करणे. आम्हाला माहीत आहे, की मानवी वापरासाठी उत्पादित केल्या जाणाऱ्या एकूण अन्नापैकी सुमारे ३५% किंवा सुमारे १३३ अब्ज पाउंड अन्नाची दर वर्षी नासाडी होते. Google च्या सस्टेनेबिलिटी उद्दिष्टांना पाठिंबा देणे हे करण्यासाठी, आम्ही २०२५ पर्यंत भरावक्षेत्रामध्ये नासाडी झालेले शून्य अन्न पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कसे? अन्न मिळवणे आणि खरेदी करणे यांदरम्यान होणारी नासाडी रोखणे, आमच्या स्वयंपाकघरांमधील कामांमध्ये नासाडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञान वापरून स्वयंपाकघरांमध्ये आणि कॅफेमध्ये सुधारणा करणे व जास्तीचे अन्न पुन्हा वापरले जाईल किंवा त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाईल याची खात्री करणे यांवर लक्ष केंद्रित करणारा आमचा तीन भागांचा दृष्टिकोन आहे. २०१४ पासून २०२१ पर्यंत, आम्ही जवळजवळ १ कोटी पाउंड अन्न भरावक्षेत्रांमध्ये जाण्यापासून रोखले.
आमच्या अन्नाच्या जागांवर प्लॅस्टिक कमी करणे यासाठीदेखील आम्ही कठोर परिश्रम करत आहोत. आम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो आणि शक्य असेल तेव्हा, नाविन्यपूर्ण, कमीत कमी पॅकेजिंग असलेली उत्पादने निवडतो, तसेच उत्पादनांची वाहतूक करण्यासाठी आम्ही तारांचे पिंजरे वापरण्यास सुरुवात केली आहे. आम्ही एकदाच वापरल्या जाणाऱ्या योगर्टच्या कपऐवजी नवीन योगर्ट बार अनुभव कसा वापरता येईल आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या पॅकेजिंगला कचऱ्याच्या प्रवाहाबाहेर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरील बिन कंटेनरमध्ये स्नॅक कसे पुरवता येतील याचादेखील विचार केला.