पक्ष्यांसाठी अनुकूल डिझाइन

सभोवतालच्या परिसराशी एकरूप होणाऱ्या इमारतीद्वारे पक्ष्यांसाठीचे धोके कमी करणे.

३ मिनिटे

झाडांनी वेढलेली Gradient Canopy इमारत

झाडांनी वेढलेली Gradient Canopy इमारत. फोटो: Google साठी इवान बान यांनी काढला आहे.

Gradient Canopy च्या मदतीने, भूप्रदेशाशी इंटिग्रेट होणारी प्रोजेक्ट साइट विकसित करणे आणि कालांतराने ती अधिक सक्षम बनवणे हे एक ध्येय होते. आमच्यासाठी, "सक्षम" म्हणजे अशी ठिकाणे जी प्रदेशाच्या दीर्घकालीन पर्यावरणीय गुणवत्तेत योगदान देतात, जिथे लोक आणि वन्यजीव दोघेही हवामानबदलांनंतरही भरभराट करू शकतात. Gradient Canopy इथे, आम्ही वन्यजीवांना महत्त्वपूर्ण आधार देणाऱ्या इकोसिस्टीमच्या ऐतिहासिक घटकांची पुनर्स्थापना करण्यासाठी काम केले आहे. तरीही, शहरी वातावरणात वन्यजीवांसाठी, विशेषतः साँगबर्ड, चिमण्या, हमिंगबर्ड वॉर्बलर यांसारख्या स्थानिक पक्ष्यांसाठी धोके आहेत हे आम्हाला समजते, म्हणून आम्ही पक्ष्यांसाठी अनुकूल अशा बऱ्याच धोरणांसह Gradient Canopy डिझाइन केले आहे.

इमारतींवरील काचेचा पक्ष्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे पक्षी इमारतीला आदळण्याच्या घटना कमी करण्यासाठी, Gradient Canopy इथे इमारत, भूप्रदेश आणि प्रकाशयोजना या गोष्टी LEED Innovation in Design Credit: Bird Collision Deterrence यानुसार डिझाइन करणे महत्त्वाचे होते.

पक्ष्यासाठी सुरक्षित डिझाइन घटकांचा समावेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग समजून घेण्याकरिता, आम्ही पक्ष्यासाठी सुरक्षित इमारतींकरिता अग्रगण्य मानके आणि शिफारशी फॉलो करण्यासाठी पर्यावरणीय सल्लागार H.T. Harvey & Associates सोबत काम केले आहे. अखेरीस, आम्ही Gradient Canopy इथे दोन मुख्य पद्धतींनी पक्ष्यासाठी अनुकूल अशा डिझाइनचा समावेश केला आहे: पहिली पद्धत म्हणजे इमारतीच्या काचेतील परावर्तकता आणि पारदर्शकता कमी करणे व दुसरी पद्धत म्हणजे अंतर्गत आणि बाह्य प्रकाश उपाययोजनांद्वारे रात्रीच्या वेळी इमारतीतील प्रकाश प्रदूषण कमी करणे

पक्षी आणि मानव दोघांनाही काच अदृश्य आहे, पण मानव कालांतराने खिडकीच्या चौकटी व परावर्तकता यांसारख्या दृश्य संकेतांद्वारे काच पाहण्यास शिकतात. दुसरीकडे, पक्ष्यांना खोलीची समज कमी असते आणि त्यांना बहुतेकदा भूप्रदेश किंवा आकाशाची प्रतिबिंबे वास्तविक वस्तू असल्यासारख्या वाटतात. एखाद्या पक्ष्याला काचेच्या कोपऱ्यांमधून इमारतीच्या आतमध्ये लावलेल्या वनस्पती किंवा रोपटी दिसल्यास, काचेच्या पारदर्शकतेमुळे तो पक्षी त्यावर आदळू शकतो. मूलतः, पारदर्शकतेमुळे असो किंवा परावर्तकतेमुळे, इमारतीच्या काचेमुळे वनस्पती अथवा आकाश जितके जास्त दृश्यमान होते, पक्ष्यांचे आदळण्याचे प्रमाण तितकेच जास्त असते.

Gradient Canopy इथे, सर्वप्रथम कमी परावर्तकता निर्देशांक असलेल्या काचेचा शोध घेणे ही आमची उपाययोजना होती. काचेच्या तंत्रज्ञानातील आणि उत्पादनातील अलीकडील प्रगतीमुळे सौर उष्णता वाढीशी तडजोड न करता कमी बाह्य परावर्तकता साध्य करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे आम्हाला इमारतीच्या अनेक खिडक्या व दर्शनी भागांसाठी चांगली काच मिळवण्यात मदत झाली. काचेवर जवळून दिसणाऱ्या खुणा, जसे की डिकॅल किंवा एंबेड केलेले सिरॅमिक "फ्रिट" याचा समावेश केल्यानेदेखील पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण नाट्यमयरीत्या कमी होऊ शकते, कारण पक्ष्यांना त्या खुणा अडथळा वाटतील आणि ते त्यातून उडण्याचा प्रयत्न करणार नाहीत. American Bird Conservancy च्या सर्वात अलीकडील मार्गदर्शनानुसार आम्ही घनदाट खुणा निवडल्या, ज्याचा उद्देश अगदी लहान हमिंगबर्डनादेखील अधिक संरक्षण देणे हा होता. Gradient Canopy इथे, आम्ही सार्वजनिक ठिकाणी दर्शनी असलेल्या भागांवर फ्रिट हे शब्दकोडे म्हणून डिझाइन केले आहे, जिथे ३० भाषांमध्ये ३० विविध स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींची नावे काचेवर एकत्र प्रिंट केलेली आहेत. पक्ष्यासाठी सुरक्षित अशा अत्यंत कार्यक्षम डिझाइन घटकामध्ये मजेशीर आणि शोध हा भाग जोडणारी गोष्ट म्हणजे "इस्टर एग."

स्थानिक पक्ष्याच्या ३० वेगवेगळ्या प्रजातींची नावे वापरून ३० भाषांमध्ये डिझाइन केलेले बर्ड फ्रिट.

स्थानिक पक्ष्याच्या ३० वेगवेगळ्या प्रजातींची नावे वापरून ३० भाषांमध्ये डिझाइन केलेले बर्ड फ्रिट. फोटो: Google साठी इवान बान यांनी काढला आहे.

अखेरीस, विशेषतः पक्ष्यांचे आदळण्याचे प्रमाण कमी करण्याचे लक्षात घेऊन आम्ही Gradient Canopy येथील प्रकाशयोजना डिझाइन केली आहे. रात्रीच्या वेळी, प्रखर प्रकाशयोजना पक्ष्यांची दिशाभूल करू शकते आणि स्थानिक अधिवासात व्यत्यय आणू शकते व रात्रीच्या वेळी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी विशेषतः हानिकारक ठरू शकते. Gradient Canopy इथे, निवासस्थानात प्रकाश जाऊ नये यासाठी आम्ही इमारतीवर किंवा आजूबाजूच्या वनस्पतींवर प्रकाश न टाकता आणि बाह्य फिक्स्चर संरक्षित करून प्रकाश प्रदूषण कमी केले आहे. आम्ही खिडक्यांसाठी रात्रीच्या वेळी बंद असलेले पडदेदेखील लावले आहेत आणि सर्व अंतर्गत दिव्यांवर रात्रीच्या वेळेचे उपस्थिती सेन्सर लावले आहेत, जेणेकरून एखादी व्यक्ती जागा वापरत असेल, तरच दिवे सुरू होतील.

Gradient Canopy येथील पक्ष्यासाठी सुरक्षित डिझाइन घटक हेतूनुसार काम करतील आणि आम्ही आवश्यकतेनुसार ॲडजस्टमेंट करू शकू याची खात्री करण्यासाठी, इमारतीच्या सभोवती चालून व निरीक्षण करून इमारत किंवा साइटच्या रचनेवर कोणताही पक्षी आदळला आहे का याचा मागोवा घेण्यासाठी आम्ही तीन वर्षांची निरीक्षण योजनादेखील तयार केली आहे. एकंदरीत, आम्हाला आशा आहे, की पक्ष्यासाठी सुरक्षित डिझाइनचा समावेश केल्याने आमच्या इमारती त्यांच्या सभोवतालच्या परिसराशी आणखी चांगल्या प्रकारे एकत्रित होण्यात मदत होईल, ज्यामुळे वन्यजीव आणि लोक निरोगी पद्धतीने एकत्र राहण्याची क्षमता वाढेल.