या प्रदेशात इतके काय खास आहे याबद्दल तुम्ही आम्हाला अधिक सांगू शकाल का?
येथील नवकल्पनेची संस्कृती भारावून टाकणारी आहे आणि नेहमीच चर्चेचा विषय असते. जगात बदल घडवून आणण्याची जवळजवळ प्रत्येकाची दृढ वचनबद्धता आहे – Google आणि Alphabet इथे यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते व मला वाटते, की इथे राहून काम करण्याचा निर्णय घेणाऱ्या इतर अनेकांनाही यामुळेच प्रेरणा मिळते. आम्हाला आशा असलेले भविष्य घडवण्याची प्रेरणा व्हॅली इथे आहे आणि मला वाटते, की यामुळेच हे ठिकाण या ग्रहावरील सर्वात खास ठिकाणांपैकी एक आहे.
Google चा माउंटन व्ह्यूशी काय संबंध आहे?
१९९९ पासून, Google ने माउंटन व्ह्यूला आपले घर म्हटले आहे आणि आम्हाला पुढील अनेक वर्षे इथे राहण्याची अपेक्षा आहे. Google ने आमच्या मुख्यालयासाठी माउंटन व्ह्यू निवडले, कारण आम्हाला इथे असण्यासंबंधित प्रत्येक गोष्ट आवडते. आम्हाला बेचे सौंदर्य, विद्यापीठे जवळपास असणे, कुटुंबस्नेही वातावरण आणि सिलिकॉन व्हॅलीच्या मध्यभागी असलेल्या शहरात काम करण्याची संधी मिळणे या गोष्टी आवडतात.
आमचे बरेच कर्मचारी माउंटन व्ह्यू इथे राहतात आणि काम करतात व कंपनी म्हणून चांगला शेजारी असण्यावर आमचा दृढ विश्वास आहे. काही उल्लेख करायचे म्हटले, तर STEM शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी Mountain View Educational Foundation ला अनुदान देऊन, Mountain View Community Shuttle साठी निधी देऊन, बेघर लोकांना मदत करणाऱ्या आणि प्रतिबंध सेवांना पाठिंबा देण्यासाठी व चार्ल्सटन रिटेन्शन बेसिन यासारखे पर्यावरणीय रिस्टोरेशन प्रोजेक्ट यांना निधी देऊन आम्ही समुदायामध्ये वर्षानुवर्षे लाखो डॉलरची गुंतवणूक केली आहे.
आणि आम्हाला खूप अभिमान आहे, की Googler दरवर्षी माउंटन व्ह्यू इथे स्थित संस्थांसह हजारो तास स्वयंसेवा करतात, ज्यामध्ये माउंटन व्ह्यूची Community Services Agency, Silicon Valley Bicycle Exchange, माउंटन व्ह्यू येथील शाळा व असामान्य Computer History Museum यांचा समावेश आहे.
Gradient Canopy आणि बे व्ह्यू हे Google चे या प्रदेशाशी असलेले दीर्घकालीन संबंध कसे पुढे सुरू ठेवतात?
Gradient Canopy हा माउंटन व्ह्यू येथील आमचा सर्वात पहिला सुरुवातीपासून केलेला डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे आणि आम्ही नॉर्थ बेशोअरच्या भविष्यासाठी शहराच्या दृष्टिकोनाला साकार करणारा प्रोजेक्ट सर्वोत्तम प्रकारे कसा एकत्रित करायचा याबद्दल बराच काळ व कठोर विचार केला आहे. Gradient Canopy इथे वेगळ्या पद्धतीने विचार करून कामाचे ठिकाण तयार केले आहे, ज्यामध्ये हेतुपुरस्सर डिझाइन आहे, जे समुदायाला आमंत्रित करते, नैसर्गिक पर्यावरणाशी सुसंवादीपणे एकात्म होते, शहरासाठी उत्तम आर्थिक मूल्य निर्माण करते आणि माउंटन व्ह्यू इथे राहून काम करणे आवडणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांनादेखील सपोर्ट करते.
महामारीच्या आधीपासून, आमच्या Google वर्कस्पेसचा अप्रतिम भाग असा आहे, की या जागा निरोगी, सस्टेनेबल आणि कार्यक्षम आहेत, ज्यामध्ये थोडीफार “Googley” शैली आहे. उत्कृष्ट डिझाइनमुळे असे ठिकाण तयार होते, जिथे लोकांना यावेसे वाटते आणि आमची ऑफिस सुरक्षितपणे पुन्हा उघडल्यानंतर जगभरातील आमच्या जवळपास पन्नास टक्के कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने येऊन काम सुरू केले हा याचाच पुरावा आहे. आमच्या अगदी सुरुवातीपासून केलेल्या प्रोजेक्टद्वारे, आता आम्ही यातील बरीच वचनबद्धता आणि शिकणे स्थानिक समुदायापर्यंत पोहोचवू शकतो. या जागा समुदायाला कसे सहभागी करून घेऊ शकतात आणि स्थितिस्थापकत्व व चांगले आरोग्य परिणाम कसे निर्माण करू शकतात यावर आम्ही खरोखर लक्ष केंद्रित केले आहे.